जळगाव पुन्हा खुनाने हादरले : दगडाने ठेचून तरुणांची हत्या !
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगावात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असताना खुनाची मालिका अधून मधून सुरूच आहे आज पुन्हा तरुणाची दगडाने ठेऊन हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
- संघटनात्मक निवडी जाहीर होण्याआधीच, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वेदना कधी ओळखणार ? ….तर पक्ष आणि नेत्याचं भवितव्य संकटात येईल ! आशयाची पेपर कटिंग कार्यकर्त्यांकडून तुफान केली जातेय शेयर
- मोठी बातमी : जीर्ण झाडाच्या नावाखाली हिरव्या डोलेदार झाडाची कत्तल, अधिकाऱ्यांनी दिली अजब परवानगी
- यावल तालुक्यातील तरुणाची जळगाव मध्ये गळफास घेऊन आत्महत्या
मिळालेली अधिक माहिती अशी की,जळगाव शहरातील कासमवाडी परिसरातील आठवडे बाजारातील मच्छी बाजाराच्या भागात आज पहाटे एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. या तरूणाचा चेहरा दगडाने ठेचला असून याची ओळख पटविण्यात अडचण आली. काही वेळाने हा एका २६ वर्षीय तरूणाला दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आल्याने निष्पन्न झाले सागर वासुदेव पाटील, वय २६ वर्षे,रा. ईश्वर कॉलनी आठवडे बाजारासमोर कासमवाडी ,असे मृत तरुणाचे नाव असल्याचे चौकशीत समोर आले.
काही दिवसांपूर्वी पिंप्राळा रेल्वे गेटजवळ झालेल्या खुनाप्रमाणेच या तरूणाला संपविण्यात आले असून या दोन्ही घटनांमध्ये साम्य आढळून आले आहे. अनिकेत प्रमाणेच सागरच्याही चेहर्यावर दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आलेली आहे. अनिकेतच्या मृतदेहाजवळ दारूच्या बाटल्या आढळून आल्या होत्या. तर सागर वासुदेव पाटीलच्या मृतदेहाजवळ देखील बियरची बाटली आढळून आली आहे. यामुळे या मर्डरचेही दारू पिण्याशी कनेक्शन असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करण्यात आला असून श्वान पथक व ठसेतज्ज्ञांनी देखील परिसराची पाहणी केली. मयत तरूणाचे पार्थिव जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.