भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जळगाव मध्ये तरुणाचा खून, पाच संशयित ताब्यात

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंच्छी या तरुणाचा मंगळवारी ९ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली, चोरीच्या संशयावरून त्याला परिसरातील ५ ते ६ जणांनी असोदा शिवारात घेऊन जात बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. मयताच्या अंगावर चटके दिल्याच्या खुणा असून उजवा हात आणि पायाला दुखापत केली असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील कांचन नगर , हरिओम नगर परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंच्छी (वय-३५) या तरुणाने शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात चोरी केल्याचा शेजाऱ्यांना संशय होता. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास चौघे जण ज्ञानेश्वर याला चार चाकीमध्ये बसवून सोबत घेऊन गेले. काही वेळाने त्याचे कुटुंबीय तक्रार नोंदविण्यासाठी शनिपेठ पोलीस ठाण्यात गेले होते. पोलिसांनी २४ तास झाल्याशिवाय तक्रार घेतली जाणार नाही, तुम्ही परिसरात त्याचा शोध घ्या असे उत्तर दिल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.
दुपारी २ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर याचा मृतदेह असोदा शिवारात पडलेला असल्याची माहिती मिळाली.

घटनेची माहिती मिळताच शनिपेठ, तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्यासह ठसे तज्ञ आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहचली. पोलिसांनी लागलीच ५ संशयित आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, घटनास्थळी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. पोलिसांनी चारचाकी देखील हस्तगत केली आहे. शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डीवायएसपी संदीप गावित, एलसीबी चे निरीक्षक किसन नजन पाटील, निरीक्षक रंगनाथ धारबळे आदींनी भेट दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!