भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावपाचोरासामाजिक

“नवरी मिळे ‘ना’ नवऱ्याला” जळगाव जिल्ह्यातील तरुणाचे डोक्याला बाशिंग बांधून अनोखे आंदोलन

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। लग्न जुळत नसल्याने तरुण शेतकरी त्रस्त झाले आहेत,त्या मुळे भर चौकात हातात बोर्ड घेवून एका तरुणाने अनोखे आंदोलन केले.

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग… अशी म्हण आहे. या म्हणीप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील एका शेतकरी तरुणाने थेट डोक्याला बाशिंग बांधून अनोखे आंदोलन केले आहे. या शेतकऱ्याची पंचक्रोशीत चांगलीत चर्चा रंगली आहे.”बागायतदार आहे बागायतदारी पाहिजे” असं या बोर्ड वर लिहिले आहे.


शेतकरी तरुणांना आणि शेतकऱ्यांच्या मुलांना विवाहासाठी मुली मिळत नसल्याने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नाचनखेडा येथील तरुण शेतकरी पंकज राजेंद्र महाले यांने पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डोक्याला वाशिंग बांधून अनोखे आंदोलन केले. बागायतदार आहे बागायतदारी पाहिजे असे फलक हातात घेऊन त्याने हे अनोखे आंदोलन करत सर्वांचेच लक्ष वेधले.

आपण मेहनती व सदन बागायतदार शेतकरी असून आपल्याला बागायतदारीनच म्हणजेच शेतात काम करणारी बायको हवी असे थेट जाहीर करून शेती करणारे तरुण व शेतकऱ्यांच्या मुलांना विवाहासाठी येणाऱ्या अडचणी या समाजासमोर मांडले आहे. तसेच या अनोख्या आंदोलनामुळे समाजाच्या डोळ्यात मात्र झणझणीत अंजन घातले आहे.

सध्या तरुणांच्या लग्नाचा विषय अवघड झाला आहे. मुलींच्या अपेक्षांमुळे अनेक तरुणांची लग्न रखडली आहे. विशेषत: ग्रामीण भागात आणि शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी नवरी मिळने कठीण झाले आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आता एका वेगळ्याच सामाजिक समस्येचा सामना करावा लागतोय. शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न जमणं कठीण झाले आहे. अगदी शेतकऱ्यांच्या मुलींनाही नोकरीवाला मुलगाच हवा आहे. लग्नासाठी मुलीच मिळत नसल्यानं शेतकरी उपवर मुलांचं लग्नाचं वय चाळीशीपर्यंत वाढल आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!