मंदिरातच पुज्याऱ्याकडून महिलेसोबत अश्लिल वर्तन
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव शहरातील मंदिरात पुजेसाठी गेलेल्या महिलेसोबत मंदिरातील पुज्याऱ्यानेच अश्लिल वर्तन करीत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली,
जळगाव शहरातील महिला त्यांच्या घराजवळ असलेल्या एका मंदिरात पुजेसाठी गेल्या असता मंदिरातील पुजा करणारे राम बालकदास महाराज त्या महिलेकडे वाईट नजरेने बघत असतात या बाबत महिलेने तीच्या पतीला देखील सांगितले. पुन्हा दि. २ सोमवार रोजी दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास ती महिला मंदिरात पुजा करण्यासाठी गेली असता, याठिकणी राम बालकदास महाराज हे त्या महिलेजवळ आले. त्यांनी महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन त्या महिलेचा विनयभंग केला.या बाबत महिलेने शहर पोलिस स्टेशनला तक्रार केल्याने राम बालकदास महाराज यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.