क्राईमजळगावधरणगाव

अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार,आरोपीस नैसर्गिक मृत्यू येई पर्यंत जन्मठेप

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। धरणगाव तालुक्यातील आठ वर्षाच्या मतिमंद मुलीवर नराधमाने अत्याचार केल्याचा प्रकार उघळकीस आला .या प्रकरणी जळगाव जिल्हा न्यायालयाने रमेश मंगा कळस्कर या नराधमाला नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप शिक्षा आणि दंडाची शिक्षा आज सुनावली.

धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणारी ८ वर्षीय मतिमंद मुलीवर गावातीलच आरोपी रमेश मंगा कळस्कर याने घरात बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करून अत्याचार केल्याची घटना २४ नोव्हेंबर २०२० सकाळी १०.३० ते ११.३० वाजेच्या सुमारास चिमुकली घरी असताना गावातील आरोपी रमेश मंगा कळस्कर याने मुलीला घरात बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करून अत्याचार केला. याबाबत धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी पोलीस ठाण्यात रमेश मंगा कळस्कर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पीडित चिमुकलीची साक्ष नोंदण्यासाठी विशेष शिक्षकांची मदत
या खटल्यात पीडित चिमुकली ही मतिमंद असल्याने तिची साक्ष नोंदण्यासाठी गुजराती मूकबधिर विद्यालयाचे विशेष शिक्षक यांच्या मदतीने सांकेतिक भाषाद्वारे, इशारे आणि खाणाखुणाच्या आधारे नोंदविण्यात आली. घटनेच्या दिवशी पिडीत चिमुकली ही घाबरलेल्या अवस्थेत रडत आरोपीच्या घरातून बाहेर पडताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे अत्याचार करणारा रमेश मंगा कळस्कर याला दोषी ठरविण्यात आले.यामध्ये एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले.

आज न्यायमूर्ती खडसे यांच्या न्यायालयात कामकाज झाले असता आरोपी रमेश कळस्कर याला विविध कलमान्वये नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप आणि ६ हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा सुनावली.आज न्यायमूर्ती खडसे यांच्या न्यायालयात कामकाज झाले , सरकार पक्षातर्फे सरकारी वकील निलेश चौधरी यांनी प्रभावी युक्तीवाद केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!