भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

इलेक्ट्रीकचा शॉक लागून पेंटरचा मृत्यु !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील पांडे चौकात रंगकाम करतांना ४० वर्षीय पेंटरला इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बाबुलाल बनीमियॉ पटेल (वय-४० , रा. तांबापूरा, जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी दुपारी सहकारी सिकंदर तडवी यांच्यासोबत पांडे चौकातील सुरेंद्र नथमल लुंकड यांच्या पत्र्याच्या शेडला रंगकाम करण्याचे काम करत होते. रंगकाम करून पत्र्याच्या शेडवरून सीडीने खाली उतरत असतांना हाताचा इलेक्ट्रीक वायरला धक्का लागल्याने त्यांना विजेचा धक्का लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत तरूणाची आर्थीक परिस्थिती हालाखीची असल्याने कुटुंबियाला आर्थीक मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला आहे. यावेळी नातेवाईक व मित्रपरिवारांची जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी जमली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!