भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

पंचायत समिती निवडणूक : सभापती पदाचे आरक्षण जाहीर!

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यातील पंचायत समित्यांची मुदत संपल्याने सध्या प्रशासक राज आहे. मात्र येत्या काही काळात निवडणूक होणार असून त्या अनुषंगाने पं.स. सभापतीपदासाठीचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले .

तालुका निहाय आरक्षण: अनुसूचित जाती महिला-१; अनुसुचीत जमाती-२ व अनुसुचीत जमाती महिला-१; नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग ( विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसह)-१; नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग महिला ( विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसह)-२ अशा प्रकारे सात पंचायत समिती सभापतीपदे राखीव आहेत. उर्वरित पदांपैकी सर्वसाधारण प्रवर्ग-४ आणि सर्वसाधारण प्रवर्ग महिला-४ असे आरक्षण निघाले आहे.

पारोळा– अनुसुचित जाती महिला, भुसावळ आणि बोदवड– अनुसुचीत जमाती, चोपडा– अनुसुचित जमाती महिला, जळगाव आणि एरंडोल– नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तर धरणगाव– नागरिकांचा मागास प्रवर्ग, रावेर, भडगाव, मुक्ताईनगर आणि चाळीसगाव– सर्वसाधारण महिला या प्रवर्गातील सभापती आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. तर, अमळनेर, जामनेर, पाचोरा आणि यावल येथे सर्वसाधारण प्रवर्गातील सभापती आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!