पोलिस पतीकडून पत्नीचा १० लाखासाठी छळ: ५ जणांवर गुन्हा !
जळगाव (प्रतिनिधी)। शहरातील शंकर आप्पा नगरात राहणाऱ्या विवाहितेच पोलीस पतीकडून मुंबई येथे घर घेण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणावेत यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कुर्ला पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले महेंद्र भगवान पाटील यांचा विवाह २०१० मध्ये रामानंद नगर परिसरात असलेल्या शंकर आप्पा नगरातील ३० अश्विनी पाटील यांचाशी झाला होता. यादरम्यान, लग्नाच्या नंतर हुंडा कमी दिला म्हणून टोमणे मारणे सुरू होते तसेचअंगावरील श्रीधन काढून दे असे सांगितल्यावर विवाहितला माहेरी पाठवून दिले. त्यानंतर मध्यस्थी करून पुन्हा संसार करण्यास पाठविले. दरम्यान, विवाहिता गर्भवती असतांना देखील सासरच्या मंडळींनी शारिरीक व मानसिक छळ केला. तर पती महेंद्र पाटील हा दारू पिऊन शिवीगाळ करू करे, तो पत्नी आश्विनीला मुंबईत घेवून गेल्यानंतर तिच्या नावाने बँकेत खाते उघडून ऑनलाईन कर्ज काढले त्यामुळे तिच्या नंबरवर फायनान्स कंपनीकडून पैश्यांसाठी फोन येत असल्यामुळे मानसिक त्रास होत होता. हा सर्व प्रकार असहाय्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासू सरलबाई भगवान पाटील, जेठ दिपक भगवान पाटील, जेठानी उज्वला दिपक पाटील, नणंद मनिषा संजय बोरसे रा. पातरखेडा ता. एरंडोल यां पाच जणांन विरुध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी महेंद्र पाटील हे करीत आहे