भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

पोलीस उपनिरीक्षक जळगाव लाचलुचपत विभागाच्या ताब्यात, ८ हजाराची लाच भोवली

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नातेवाईकांसह तक्रारदारास अटक न करण्यासह न्यायालयात दोषारोप पत्र लवकर पाठविण्याच्या मोबदल्यात ८ हजाराची लाच घेतांना पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयवंत प्रल्हाद पाटील यांना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक असे की, पारोळा पोलीस ठाण्यात तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांना अटक न करण्यासाठी आणि न्यायालयात दोषारोप पत्र लवकर पाठविण्यासाठी पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयवंत प्रल्हाद पाटील ,वय-५४ वर्ष यांनी तक्रारदाराकडे ३० हजारांची मागणी केली. यापुर्वी पोलीस उपनिरीक्षक जयवंत पाटील यांनी तक्रारदाराकडून २० हजार रूपये घेतले. उर्वरित १० हजार नंतर देऊ असे ठरले

दरम्यान तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिल्याने मंगळवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी सापळा रचला. यात तक्रारदाकडून तडजोडअंती ८ हजारा रूपये स्विकारतांना पोलीस उपनिरीक्षक जयवंत पाटील याना रंगेहात पकडले . या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून पारोळा पोलीस स्टेशनला या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ. राकेश दुसाने, पो. कॉ. प्रणेश ठाकुर यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!