भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

टीका न करता कामाचे कौतुक करत प्रोत्साहन द्यायला हवे : गुलाबराव पाटीलांना रक्षा खडसेंचा खोचक टोला

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

जळगाव, प्रतिनिधी : “केळी पीक योजनेच्या नुकसान भरपाईचे निकष बदल करण्याचे श्रेय मी घेत नाही. मात्र मंत्री गुलाबराव पाटील हे मला वडिलांसारखे आहेत. त्यामुळे याप्रकरणी त्यांनी माझ्यावर टीका न करता मुलीने चांगले काम केले म्हणून प्रोत्साहन द्यायला हवे,  असा खोचक टोला पाटील यांना भाजप खासदार रक्षा खडसे यांनी लगावला आहे. RakshaKhadse vs #gulabraoPatil #Jalgaon

केळी पीक विम्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यावरून केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्यातील सत्ताधारी महाविकासआघाडी यांच्यात श्रेय घेण्यावरुन वाद सुरु झाला आहे. याच वादातून राज्याचे पाणी पुरवठा योजना मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्यात चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळाला. गुलाबराव पाटील यांनी टीका करत म्हणाले होते, हवामानावर आधारित फळपीक विम्याचे निकष राज्य शासनाने बदलले. पण भाजप खासदार रक्षा खडसे या केंद्राने निकष बदलल्याचा खोटा दावा करीत आहेत. कुठे लग्न दिसले की आपला वाजा घेऊन त्या ठिकाणी वाजविण्यास त्या हजर होता.

या टीकेला रक्षा खडसे यांनीही शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिले. “मी गेल्या अनेक दिवसांपासून मुलांसोबत बाहेरगावी होते. याबाबत मी कोणतेही श्रेय घेतले नाही. माझे कुठेही वक्तव्य नाही. यामध्ये कोणाचेही श्रेय नाही. आम्ही फक्त शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला. त्यामुळे राज्य सरकारला निकष बदलावे लागेल,” असे रक्षा खडसेंनी सांगितले. मात्र यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माझ्यावर टीका करावी याचे मला आश्चर्य वाटत आहे. ते मला वडिलांसारखे आहेत. उलट मुलगी म्हणून त्यांनी या मुद्द्यावर चांगले काम केल्याने माझे कौतुक करुन प्रोत्साहन देण्याची गरज होती,”

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!