जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। येत्या काळात येणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, अक्षय्य तृतीया, व रमजान ईद पाश्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून प्रशासनाने जिल्ह्यात मुंबई पोलिस अधिनियम ३७ (१)(३)अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत.अपर जिल्हा दंडाधिकारी राहुल पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्याला हे आदेश लागू केले आहेत.
या आदेशानुसार जमाव गोळा करण्यास व शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आले आहे. सार्वजनिक शांततेला गालबोट लागेल लागेल असे कृत्य करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. अन्यथा, नियमाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल केला जाणार आहे. कुठेही गोधळ होणार नाही यासाठी पोलिस यंत्रणा दक्ष झाली असल्याच सांगण्यात येत आहे. हे आदेश ९ ते २३ एप्रिलपर्यंत अमलात राहतील.