भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

अ भा वि प जळगाव कडून दिल्ली येथील घटनेचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। श्रद्धा वालकर केसने अवघा देश हादरलाय. दिल्लीतील मेहरौली भागात श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं गळा दाबून क्रूर पणे हत्या केली.आणि तो एवढ्यावरच थांबला नाही. त्यानंतर त्यानं मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे केले, ते फ्रिजमध्ये ठेऊन. त्यानंतर दिल्लीतील वेगवेगळ्या परिसरात जाऊन ठराविक अंतरानं टाकून दिले.सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या खुनाचा उलगडा आता झाला तेव्हा या घटनेतलं कौर्यही समोर आलं. दोघेही मूळचे वसईतलेच होते. श्रद्धाच्या या प्रेमप्रकरणाला तिच्या घरच्यांचा विरोध असूनही .ती विरोध झुगारून आफताब सोबत लिव्ह इन रिलॅशनशिपमध्ये राहत होती. तिने आफताबकडे लग्नासाठी तगादा लावल्यानं त्यानं तिची हत्या केल्याचं समोर आलंय.

आफताब अमीन पूनावाला याला अटक केल्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आलय.पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, श्रद्धाच्या शरीराचे काही अवशेष सापडले आहेत. सध्या पोलीस हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घेत आहेत. विश्वासघात आणि फसवणुकीच्या व प्रेमाच्या नावा खाली एक मोठं षड्यंत्र चालवणाऱ्या या संतापजनक घटने नंतर ही आरोपी आफताब सहा महिने फरार होता. त्याच्या चौकशीत हत्येचा तपशील समोर आल्यानंतर शनिवारी सकाळी त्याला अटक करण्यात आली.

या क्रूर घटनेचा निषेध म्हणून आज अखिल भारतीय विद्यार्थी परीषद जळगाव महानगरच्यां वतीने तीव्र स्वरूपाचे निदर्शने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली व लवकरात लवकर या आरोपीला भर चौकात फाशी देण्यात यावी अशी मागणी जिल्हा संयोजक मयुर माळी यांनी केली प्रसंगी प्रांत एकलव्य सायिजक चेतन नेमाडे,शिवा ठाकूर,भावीन पाटील,कुणाल कोळी, अश्विन पाटील,केशव पाटील, ऋषिकेश रावेरकर,शुभम तायडे,जयेश पाटील,कुंधन कोळी, गणेश बाविस्कर,हरीश बुचा,रिषभ शुक्ला कल्पेश जयस्वाल, ऋषिकेश पाटील व पीयूष माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!