भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

मविप्र वाद प्रकरणी पुणे पथकाचे जळगावात छापे !

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील मविप्र वाद प्रकरणी ऍड.विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुणे, कोथरूड पोलिसांचा मोठा फौजफाटा जळगावात दाखल झाला असून या प्रकरणात आज जळगावात पाच ठिकाणी छापे मारण्यात आल्याची माहिती मिळत असून यामुळे खळबळ उडाली आहे.

मविप्र’च्या वादातून अॅड. विजय भास्कर पाटील यांनी माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह इतरांवर निंभोरा पोलिस ठाण्यात ९ डिसेंबर २०२० रोजी सात पानांची फिर्याद दिली होती. या गुन्ह्यातील भोईटे गटाच्या ९ जणांवर ‘मकोका’ लावण्यात आलेला आहे. दरम्यान, आज पहाटे कोथरूड पोलिसांचे ७० कर्मचारी, अधिकारींचे पथक जळगावात धडकल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार स्थानिक पोलिसांना सोबत घेत पुणे येथील सहा मुख्य संशयितांच्या घरी पोहचले आहे. पथक या पाचही जणांच्या घरी झाडाझडती घेणार आहे. भोईटे आणि देशमुख यांच्या घरी पथक तळ ठोकून आहे. पोलीस ‘मविप्र’ या संस्थेशी संबंधित कागदपत्र, संगणक वैगरे महत्वपूर्ण पुरावे ताब्यात घेणार असल्याचे कळते. निलेश रणजीत भोईटे, तानाजी भोईटे, महेंद्र भोईटे, प्राचार्य एल. पी. देशमुख आणि प्रमोद काळे यांच्या जळगावातील निवासस्थानी पुणे पोलिसांचे सुमारे ७० कर्मचार्‍यांचे पथक दाखल झाले असून पोलीस उपायुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे. या संदर्भात त्यांनी अद्याप काहीही माहिती देण्यास नकार दिला असून तपास पूर्ण झाल्यानंतरच त्या प्रसारमाध्यमांना माहिती देणार आहेत.

कालच दिवशी याप्रकरणी खडसे आणि महाजन यांनी मकेका कारवाईबाबत वक्तव्य केले होते. सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याशी याबाबत चर्चा केली असता अद्याप चौकशी सुरू असून चौकशीनंतर माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जळगावात सकाळीच पथक धडकल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!