रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा जळगावात पर्दाफाश
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। कोरोनाच्या महामारी मुळे कोरोना रुग्णाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने उपचारा अभावी कोरोना रुग्णाच्या मृत्यूच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणारे रेमडेसिवीर घेण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक नाईलाजास्तव वाटेल तेव्हढी किंमत द्यायला तयार असल्याने याचा फायदा घेत काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा जळगाव पोलिसांनी पर्दा फाश केला असून आठ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली .
सरकारी दराच्या तुलनेत कमाल 35 हजार रुपयांपर्यंत ताब्यात घेण्यात आलेल्या, एका प्रकरणात 6 व दुस-या प्रकरणात 2 अशी जादा दराने विक्री झालेली एकुण 8 रेमडीसीवीर इंजेक्शन्स या रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या दराने बेकायदा विक्री सुरु होती. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या गुन्ह्यात 9 आरोपी निष्पन्न करण्यात आली असून त्यातील एकुण 8 आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. अटकेतील आरोपींकडून 6 इंजेक्शन्स हस्तगत करण्यात आली आहेत. दुस-या गुन्ह्यात 2 इंजेक्शन्स हस्तगत करण्यात आली आहेत.
डॉ मुंडे यांनी पुढे सांगितले की,जळगाव येथील ज्युपीटर हॉस्पीटलचा वार्ड बॉय शुभम शार्दुल याच्यापासून तपासाची लिंक लागण्यास सुरुवात झाली. शुभम शार्दुल याने मयुर विसावे या वैद्यकीय प्रतिनिधीकडून इंजेक्शन्स घेतले होते. मयुर विसावे याने ते इंजेक्शन्स आकाश जैन ,नवकार फार्मा मेडीकल याच्याकडून घेतले होते. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
दुस-या प्रकरणात दहा जणांची लिंक आढळून आली. त्यापैकी नऊ जण अटक करण्यात आले आहेत. या प्रकरणातील शेख समीर शेख सगीर याच्यापासून तपासाची लिंक लागली. शेख समीर हा ऑर्कीड हॉस्पीटल येथे लॅब असिस्टंट म्हणून कामाला होता. रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या टोळीची लिंक तपासली असता त्यात दहा आरोपी निष्पन्न झाले. त्यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली. या टोळीतील डॉ. तौफिक शेख हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे. पोलिस त्याच्या मागावर आहे. डॉ. तौफिक शेख हा तांबापुरा येथील दवाखान्यात काम करत असल्याचे डॉ मुंडे यांनी सांगितले तसेच वाढीव दराने कुणी रेमडेसिवीर इंजेक्शन्स विकत असतील किंवा कुणाला याबाबत माहिती असल्यास जळगाव पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी केले असून जनतेला थेट पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याशी 7219091773 या क्रमांकावर देखील संपर्क साधावा असे आवाहनही केले आहे.