लाल मिरचीचा ठसका वाढला, तिखट तडका लाल मिरचीला यंदा अच्छे दिन
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। कुठल्याही खाद्यपदार्थाला तिखट तडका देण्यासाठी हमखास वापरण्यात येणाऱ्या लाल मिरचीला यंदा अच्छे दिन आले आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नागपुरातील कळमना मार्केटची ओळख आहे, मिरचीला समाधानकारक बाजार भाव मिळत असल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
बाजारात लाल मिरचीची आवक सुरू झाली आहे. लाल मिरची उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजार भाव मिळत आहे. मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाचे सार्थक होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मागल्या वर्षीपेक्षा यंदा मिरची दरात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तीन वर्षापासून मिरची उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतातील मिरचीला चांगली मागणी मिळत आहे. २०१९ नंतर चायना, मलेशिया, इंडोनेशिया, बांगलादेश, श्रीलंका इत्यादी देशांमध्ये मिरचीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्या मिरचीला कधी १०० रुपयांवर बाजार भाव नव्हता ती मिरची आत्ता १०००-११०० रुपयांपर्यंत विकली जात आहे.
किलो ला १००० ते ११०० रुपये भाव
सिंगल पट्टी व गुजराती मिरचीला लोकांची पसंती आहे. गुजराती लोक जे गोड जेवण पसंत करतात अशांसाठी या मिरचीची मोठी मागणी असते. या मिरचीला तेज पणा कमी असून दिसायला मात्र लाल दिसते. त्याही मिरचीची डिमांड अधिक असून आवक कमी आहे. यासह तेजा , चिखली बुलढाणा , चपाटा,सिमला,मद्रास तर १००० ते १२०० रुपये प्रति किलो प्रमाणे विकली जात आहे. मिरचीच्या किमतीमध्ये दुपटीने वाढ झालेली आहे, .