नात्याला काळिमा ; नराधम बापाचा पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यात बाप व मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी व मानवजातीला लज्जित करणारी घटना घडली, एका नराधम बापाने पोटच्या अल्पवयीन मुलीवरच मागील दीड वर्षापासून वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.
गेल्या सुमारे दिड वर्षापासून आई-वडील यांच्यात भांडण होत असल्याने भांडण झाल्यावर आई बाहेरगावी निघून जायची, त्यामुळे त्यांची मुलगी वडिलांसोबत घरीच राहून शाळेत जात होती, परंतू नराधम बाप रात्री घरी आल्यावर मुलीचे लैंगिक शोषण करायचा. आई निघुन गेल्यावर रात्रीच्या वेळेस नेहमीच नराधम बाप पिडीतेसोबत संबंध ठेऊ लागला, पिडीतेने विरोध केला असता तुला आणि तुझ्या आईला मारेन अशी धमकी वारंवार देत असल्याने भीतीपोटी या प्रकाराबाबात पिडीतेने कुणालाही सांगितले नाही.
परंतु वडिलांचा नेहमीच अत्याचार सहन करीत असताना पुन्हा २१ एप्रिल पासून वडिलांसोबत भांडण झाल्याने पिडीत मुलीची आई बाहेर निघून गेली होती. नेहमीच पिडिता वडिलांचा अत्याचार सहन करत असता १५ तारखेला वडिलांनी केलेला अत्याचार पिडीतेला असहय झाल्याने दि.१८ रोजी आई आजी सह घरी परत आल्यावर तिने आई व आजी यांना तिच्यावर झालेल्या अत्याचारा बाबत सर्व घडलेल्या घटना सांगीतल्या. त्यानंतर दि. २० रोजी पिडीतेने आईसोबत पोलीस स्टेशन येऊन तक्रार दाखल केली.
ही घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर परिसरातील असून
पोलिसांनी लागलीच नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास अमळनेर पोलिसस्टेशनचे सपोनी हरीदास बोचरे हे करीत आहेत.