भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

आर.एल. समूहाच्या ३१५ कोटी रूपये मूल्य असणार्‍या ७० मालमत्ता ईडीने केल्या जप्त

मुंबई,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आर.एल. समूहाचे माजी खासदार ईश्‍वरबाबूजी जैन आणि त्यांचे पुत्र माजी आमदार मनीष जैन यांच्या सुमारे ३१५ कोटी रूपये मूल्य असणार्‍या ७० मालमत्ता सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, मानराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड व आर.एल. गोल्ड प्रा. लि. या कंपन्यांच्या ७० मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. यात या कंपन्यांच्या मालकीच्या जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छ येथील मालमत्तांचा समावेश आहे. ही कारवाई पीएमएलए कायद्याच्या अंतर्गत करण्यात आल्याची माहिती ईडीने आपल्या ट्विटमधून दिली आहे.

एसबीआयकडून जैन कुटुंबाने घेतलेल्या कर्जाच्या संदर्भात अलीकडेच आर.एल. समूहावर ईडीने छापा टाकला होता. यात सखोल चौकशी करण्यात आली असून यानंतर मनीषदादा जैन आणि त्यांच्या कुटुंबियांची ईडीतर्फे चौकशी देखील करण्यात आली होती. यानंतर ईडीने आज मोठी कारवाई केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!