खळबळजनक ; अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचाराचे व्हिडीओ चित्रीकरण : गुन्हा दाखल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। तालुक्यात सहा वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचाराचे व्हिडीओ चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना घडली दोन अल्पवयीन मुलांवर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, २६ मार्च रोजी दुपारी गावातील मंदिरात मुलगा दर्शनासाठी गेला होता. सोबत एक १५ वर्षीय व १६ वर्षीय असे दोन मुले देखील होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे दोन्ही अल्पवयीन मुलांनी सहा वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. हा प्रकार पीडित मुलाच्या नातेवाईकाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतला होता.
हा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ मुलाच्या नातेवाईकांनी बघितला असता त्यांना धक्काच बसला. त्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात दोन्ही अल्पवयीन मुलांच्या विरोधात तक्रार दिली पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहेत.