भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

अल्पवयीन मुलीची वेश्याव्यवसाया साठी विक्री, बालविवाह लावून देण्याचा प्रयत्न

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। अल्पवयीन मुलीची वेश्याव्यवसाय करण्यासाठी विक्री तसेच बळजबरी विवाह लावून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती आजही की,परभणी जिल्ह्यातील १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यातील प्रमुख संशयीत आरोपी महिलेने पिडीत अल्पवयीन मुलीला तिच्या दिर व दिराणी तसेच दिराचा शालक अशा तिघांना वेश्याव्यवसाया साठी विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यातील संशयीत आरोपी असलेल्या महिलेच्या दिराच्या शालकासोबत पीडित मुलीचा बळजबरी बालविवाह लावून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही पिडितेने फिर्यादीत केला आहे. २३ ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात घडलेल्या या गुन्ह्याच्या संशयितांना अद्याप अटक करण्यात आली नसून पोलिस त्यांच्या मागावर असल्याची माहिती मिळत असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे हे करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!