सरकारी जागेवर घरकुल व जादा बांधकाम केल्याने सरपंच अपात्र
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। खाजगी मालकीची जागा मिळकत असतांना देखील सरकारी गावठान जागेवर अतिक्रमण करून घरकुलाचे बांधकाम केल्यामुळे कु-हाड बु. ता.पाचोरा येथील ग्राम पंचायतीचे सरपंच उदयसिंग लखिचंद राठोड याना सरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे म्हणून राजू सखाराम राठोड व राजू भूरा राठोड यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर सखोल चौकशी होऊन शासकीय जागेवर बेकायदा अतिक्रमण करून इंदिरा आवास योजनेतुन राहते घराचे बांधकाम केल्याचे सिद्ध झाल्यामुळे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत. यांनी उदयसिंग राठोड यांना सरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरविले आहे.
या बाबत सवीस्तर वॄत असे कि सरपंच उदयसिंग राठोड यांचे नावे जागा मिळकत क्र १५ ही खाजगी जागा असतांना त्यांनी ग्रा प. जागा मिळकत क्र. २१० या सरकारी जमिनीवर विना परवानगी अतिक्रमण करुण घरकुलाचे बांधकाम केल्यामुळे व एकत्र कुटुंब सह लाभ घेत असल्यामुळे त्यांना सदस्य व सरपंच पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे. म्हणून राजू सखाराम राठोड व राजू भूरा राठोड यांनी ग्रा. प. अधिनियम १९५८ चे कलम १४.जे- ३ प्रमाणे जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडे विवाद अर्ज क्र-२७/ ०२२.ने तक्रार दाखल केली असता त्यावर कायदेशीर सुनावणी होऊन सरपंच यांनी स्वतःची खाजगी जागा मिळकत असताना देखील शासकीय गावठाण जागा क्र २१० ही जागा मिळकती वर इंदिरा आवास योजनेतुन घरकुल बांधकाम केले आहे तसेच सार्वजनिक जागेवर १६ फुट जादा वाढीव बांधकाम केलेले आहे.
सरपंच यांनी स्वत: ची खाजगी जागा सुरक्षित ठेऊन शासकीय व सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्यामुळे. जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांनी उदयसिंग लखिचंद राठोड यांना ग्रा.प.सरपंच व सदस्य पदावरून अपात्र घोषित केले आहे. या निकाला मुळे जिह्यातील ग्राम पंचायत पदाधिकारी यांचेत खळबळ उडाली आहे. तक्ररदार राजू राठोड व राजू भूरा राठोड. यांचे वतीने अँड. विश्वासराव भोसले.(पिंपरखेड) यांनी काम पाहिले.