कोरोना काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली..! हॉटेलचे अर्धशटर ठेऊन अवैध देशी-विदेशी दारूची विक्री
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा ता.रावेर (प्रतिनिधी): येथील हॉटेलवर रात्री उशिरा पर्यंत हॉटेलला दारू विक्रीचा कुठलाही परवाना नसताना अवैध पणे देशी-विदेशी दारूची विक्री केली जाते.
जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांचेकडून २८ मार्च ते ३०मार्च पर्यंत विशेष लॉक डाऊन करण्यात आला असता सर्व दुकाने पूर्णपणे बंद असे सक्त आदेश असताना सावदा शहरात बसस्थानक परिसरा जवळ बऱ्हाणपूर-अंकलेश्वर मार्गावर देशी-विदेशी दारू दुकान परिसरात रोडला लागून कुठलाही परवाना नसताना हॉटेलवर हॉटेलचे शटर अर्ध ठेऊन अवैधपणे देशी-विदेशी दारूची सर्रास विक्री केली जाते. तसेच हॉटेलच्या मागील बाजूने सुद्धा दारूची विक्री केली जाते
महाशिवरात्रीच्या रात्री सुद्धा येथे रात्री एक-दोन वाजे पर्यंत अर्ध शटर उघडे ठेवून मांगाल ती देशी-विदेशी दारूची विक्री केली गेली, या रोडवरून अधिकाऱ्यांच्या गाड्या ये-जा करीत असतात, या बाबत प्रशासन अनभीग्न आहे का ….? लॉक डाऊन चा नियम फक्त सामान्य जनतेसाठीच का..?