खळबळजनक : १६ वर्षीय मुलीला अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एका १६ वर्षीय मुलीला चाळीसगाव येथे बोलावून तिला नशेचे द्रव्य पाजून इतर अनेक लोकांशी अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकिस अली
शनिवारी (दि. २५) रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा झाला आहे. जळगाव शहरात राहणाऱ्या सोळावर्षीय अल्पवयीन मुलीला ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता नितू ऊर्फ जोया राजू बागडे (३१, रा. जळगाव), ज्योती चंद्रकांत सरदार (२८) आणि चंद्रकांत शंकर सरदार (२९, दोघे रा. आनंदवाडी, चाळीसगाव) यांनी चाळीसगाव येथे बोलावून तिला नशेचे द्रव्य पाजून वेगवेगळ्या लोकांसोबत अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला घरी पाठविले. पुन्हा १० फेब्रुवारी रोजी चाळीसगावला घेऊन गेले. तिथे २३ फेब्रुवारी पर्यंत रोज रात्री अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले. घडलेला सर्व प्रकार तिने तिच्या आईला सांगितला. पीडित मुलीने आईसह एमआयडीसी पोलिस स्टेशनला तिघांविरोधात तक्रार दाखल केली असून तिघे संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे