ब्रेकिंग; जळगावातील गोलाणी मार्केटमधील कुंटनखान्यावर छापा
जळगाव,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। शहरातील गोलाणी मार्केट मधील एका कार्यालयाच्या खोलीत सुरू असलेल्या कुंटनखान्यातून पोलिसांनी दोन ग्राहक पुरुष आणि ६ महिलांना ताब्यात घेतल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमधील एका कार्यालयाच्या खोलीत बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे व पथकाने छापा टाकला. एका कंपनीच्या नावे असलेल्या खोलीत कुंटनखाना सुरू होता.
पोलिसांनी छाप्यात २ पुरुष आणि ६ तरुणी, महिलांना ताब्यात घेतले आहे. सर्वांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून चौकशी सुरू आहे. दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागात कुंटनखाना सुरू असल्याचे समोर आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.