भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

जिल्ह्यातील पाच बंडखोर आमदारांच्या विरोधात आज शिवसेनेचा आक्रोश मोर्चा

जळगाव,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। जिल्ह्यातील शिवसेनेच्या मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, लता सोनवणे व अपक्ष आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी केल्याने शिवसैनिक संतप्त झाले असून या पाच बंडखोर आमदारांच्या विरोधात आज शिवसेनेचा आक्रोश मोर्चा निघणार आहे. .

या पाचही बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली असल्याने या पाचही बंडखाेरांविराेधात जळगावात शनिवारी दुपारी २ वाजता शिवसेनेचा आक्रोश माेर्चा शिवतीर्थ मैदानापासून निघणार असून निघणाऱ्या या मोर्चाचे नेतृत्व संपर्क प्रमुख संजय सावंत करणार आहेत. या माेर्चात जिल्हाभरातून १० ते १५ हजार नागरीक सहभागी हाेतील, अशी माहिती शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, समाधान महाजन, महापौर जयश्री महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे आदींनी दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!