धक्कादायक! शेतात बैल घुसला, काकानेच घेतला पुतण्याचा जीव
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। बैल शेतात घुसल्याच्या कारणावरून वाद विकोपाला पोहोचला अन चुलत काकांनी पुतण्याच्या डोक्यावर काठीने वार केला.आणि त्यात पुतण्याला आपला जीव गमवावा लागला.
पुनमचंद भोसले यांची बैलजोडी त्यांचे चुलत काका प्रल्हाद भोसले यांच्या शेतात गेल्याने वाद झाला . या वादात प्रल्हाद भोसले यांनी पूनमचंद भोसले यांच्या मुलाच्या पाठीत काठीने वार केला. तर प्रल्हाद भोसले यांचा मुलगा गणेश भोसले यांनी पूनमचंद भोसले यांच्या डोक्यात काठीने जोरदार वार केला.
काकाने डोक्यात वार केल्याने यात गंभीर जखमी झालेल्या पुतण्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातल्या वाडी शेवाळे येथे घडली. याप्रकरणी चुलत काका आणि चुलत भावाविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या घटनेत पूनमचंद भोसले हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी प्रल्हाद भोसले आणि त्यांचा मुलगा गणेश भोसले या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.