भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचोपडाजळगाव

धक्कादायक ; गुप्तांगावर वार करून तरुणाची हत्या

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून, गुप्तांगावर वार करून एका ३० वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळं खळबळ उडाली असून याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश वेरसिंग सस्ते (पावरा) वय ३०, रा.पिसनाबल ता सेधंवा जि वडवणी ह.मु. अकुलखेडा ता चोपडा, असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या संदर्भात मयताचा भाऊ दिलीप वेरसिंग सस्ते (पावरा) यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीनुसार दि. २ ऑक्टोंबर २०२२ रोजीचे सांयकाळी ४.३० ते दि. ३ ऑक्टोंबरच्या रोजी सकाळी १०.३० वाजेपूर्वी कोणी कोणत्या तरी कारणावरुन दिनेशचा खून केला आहे. दिनेशचा मृतदेह अकुलखेडा गावाजवळ संकेत हॉटेल समोर असलेल्या पाटाचे चारीजवळ मिळून आला होता. दिनेशच्या गुप्तांगावर गंभीर दुखापत आढळून आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!