तपासणी साठी आलेल्या महिलारुग्णा सोबत डॉक्टरांचे धक्कादायक कृत्य, जळगाव जिल्ह्यातील घटना
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यातील एका डॉक्टरने तपासणी साठी आलेल्या रुग्ण महिले सोबत धक्कादायक कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. नेहमीच पोट दुखत असल्याने एक महिला उपचारासाठी डॉक्टरांकडे गेली असता या महिलेचा डॉक्टरने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा डॉक्टर अनिल शिंदे यांच्याविरुद्ध विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने या घटनेमुळे जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
महिलेचं नेहमीच पोट दुखत असल्याने महिलेनं धुळे येथील एका रुग्णालयात तपासणी केली होती या तपासणीत अपेंडिक्स असल्याचं निदान करण्यात आलं होतं, या संदर्भात उपचारासाठी महिला अमळनेर येथील डॉ. अनिल शिंदे यांच्या नर्मदा हॉस्पिटलमध्ये गेली असता तपासणी करण्याच्या बहाण्याने डॉक्टर अनिल शिंदे यांनी विनयभंग केला असल्याचा आरोप पीडित महिलेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.