धक्कादायक ; आठ वर्षांपासून जळगावातील तरुणीवर अत्याचार
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव शहरातील आता २२ वर्षांची असलेली तरूणी १४ वर्षांची होती तेंव्हापासून म्हणजे आठ वर्षांपासून तिच्यावर सतत अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक गुन्हा समोर आला आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळातील २२ वर्षीय तरूणी सध्या जळगावात राहते . ८ वर्षांपूर्वी म्हणजे तिचे वय १४ वर्ष असतांना ती भुसावळातील एका शाळेत शिक्षण घेत होती. त्यावेळी भुसावळातील रितेश सुनील बाविस्कर याची ओळख मुलीशी झाली. त्याने शाळेत होणारे कार्यक्रमांचे वेळी केव्हातरी मोपिंग केलेले अश्लिल फोटो व व्हिडीओ मुलीला दाखवले आणि धमकी दिली की, ‘तुला जसे सांगेन तसे कर नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियात व्हायरल करेल’ .
तरूणी आठ वर्षांपुर्वी अल्पवयीन असताना तिला गाडीवर जबरदस्ती बसवून सोबत रीतेशचा मित्र बंटी आणि राहुल देखील होते. इंजिनघाट परिसरात घेऊन तिच्यासोबत अत्याचार केला. बंटी आणि राहुल यांनी अत्याचाराचे फोटो काढले तिच्या हातातील सोन्याची अंगठी काढून तिला पुन्हा शाळेजवळ सोडले. रितेशने सांगितले की, ‘तू कोणाला काही सांगितले तर तुझे फोटो व्हायरल करील’ . त्याचप्रमाणे आरोपी रितेशची आई शोभा बाविस्कर आणि बहीण यांनीही त्या मुलीला घरातून पैसे चोरून आणावे असे सांगितले.
हा प्रकार आठ वर्षांपासून सुरू होता. मुलगी २२ वर्षाची झाली असताना तिच्या नातेवाईकांनी तिचा लग्नाची चर्चा सुरु केली . ही चर्चा रितेशला समजल्यानंतर त्याने १९ एप्रिल रोजी तरुणीला कॉलेजमधून गाडीवर घेऊन बिग बाजार येथे जळगावला आणले. या ठिकाणी देखील विनयभंग करून तिच्यावर अत्याचार केला आणि ‘मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, लग्न केले नाही तर तुझ्या भावाला मारून टाकेल’ अशी धमकी दिली. छळाला व अत्याचाराला कंटाळून तरुणीने २५ एप्रिलरोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीवरून आरोपी रितेश बाविस्कर, त्याची आई शोभा बाविस्कर, त्याची बहीण नंदनी कोळी, त्याचे वडील सुनील बाविस्कर ( सर्व रा. भुसावळ ) , मित्र उर्वेश पाटील. बंटी आणि राहुल (पुर्ण नावे माहित नाही) अशा ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो उ नि अरुण सोनार करीत आहेत.