भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावजामनेर

पाच लाखांची लाच घेताना सहा.बीडीओ सह विस्तार अधिकार्‍याला अटक

जळगाव,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। पाच लाखांची लाच घेताना सहायक गटविकास अधिकारी रवींद्र शालीग्राम सपकाळे व विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे याना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याने मोठी खळबळ उडाली .

जामनेर तालुक्यातील एका लोकसेवकाच्या विरोधात चौकशी सुरू होती. या चौकशीत अनुकुल असा रिपोर्ट देण्याच्या बदल्यात त्याला संबंधीत समितीचे अध्यक्ष व सदस्याने तब्बल पाच लाख रूपयांची लाच मागितली होती. तर, संबंधीत व्यक्तीने या संदर्भात जळगावच्या अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती.या तक्रारीनुसार आज पाडव्याची सुटी असतांना देखील सहायक गटविकास अधिकारी रवींद्र शालीग्राम सपकाळे, वय ५४ वर्ष, आणि विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे, वय ५३ वर्षे या पंचायत समितीतील दोन्ही अधिकार्‍यांनी तक्रारदाराला आज सुटीचा दिवस असूनही बोलावले होते. येथे पाच लाखांची लाच स्वीकारत असतांना या दोघांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून त्यांना अटक केली.

ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव बाळू मराठे, सुनील वानखेडे, राकेश दुसाने, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर यांनी केली. या बाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!