भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावशैक्षणिक

SSC-HSC Exam : 10 वी 12 वी परीक्षा कालावधी साठी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश….

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। होऊ घातलेल्या 10 वी,12 वी च्या परीक्षा कालावधी मध्ये जळगाव जिल्ह्यात कलम 144 लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिनांक 17 रोजी आदेश काढले असून काही लावण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांनी काढलेले आदेश….

ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय, मुंबई यांचेकडील उपोद्घातात नमूद क्रमांक दंडप्र/ 2/कावि/ईटपाल/2023 जिल्हादंडाधिकारी यांचे कार्यालय जळगाव ची परिक्षा दिनांक 21/02/2023 ते दिनांक 21/03/2023 या कालावधीत व इयत्ता 10 वी ची परिक्षा दिनांक 02/03/2023 ते दिनांक 25/03/2023 या कालावधीत घेण्यात येणार असून सदर परिक्षा काल्वावधीत परिक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. आणि ज्याअर्थी, जळगाव जिल्ह्यात इयत्ता 12 वी करीता एकूण 76 परिक्षा केंद्रे व इयत्ता 10 वी करीता एकूण 139 परिक्षा केंद्रे निश्चित करण्यात आलेले असून सदर परिक्षेच्या कालावधीत परिक्षा केंद्रावर गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच परिक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्याअर्थी, मी अमन मित्तल, जिल्हादंडाधिकारी जळगाव फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जळगाव जिल्ह्यात दिनांक 21/02/2023 ते दिनांक 25/03/2023 या कालावधीत परिक्षा केंद्राचे ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम् 144 (1) (2) अन्वये खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

1) जळगाव जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या इयत्ता 12 वी करीता एकूण 76 परिक्षा केंद्रे व इयत्ता 10 वी करीता एकूण 139 परिक्षा केंद्रांच्या ठिकाणी दिनांक 21/02/2023 ते दिनांक 25/03/2023 या कालावधीत पेपर सुरु झालेपासून ते पेपर संपेपर्यंतच्या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील सर्व परिक्षा केंद्राचे 50 मीटर परिसरात कोणीही प्रवेश करू नये. सदर आदेश परिक्षार्थी नियुक्त अधिकारी / कर्मचारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही.

2) सर्व परिक्षा केंद्रा जवळच्या 50 मीटरच्या आतील परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने हे वर नमूद कालावधीत पेपर सुरु झालेपासून ते पेपर संपेपर्यंतच्या कालावधीत बंद ठेवणेत यावेत. सदरचा आदेश हा सर्व संबंधीतावर वैयक्तिकरित्या नोटीस बजावणी करण्याबाबत पुरेसा कालावधी नसलेने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे फलम 144 (1) (2) नुसार एकतर्फी काढण्यात येत आहे. सदरचा आदेश हा आज दिनांक 17/02/2023 रोजी माझे सही व शिक्यानिशी दिला असे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!