काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली बंद करा अन्यथा आंदोलन– मनसेचा इशारा
मंडे टू मंडे न्युज, वृत्तसेवा : वृक्षारोपणाचे काम व महामार्गाचे काम अपुर्ण असतांना केली जात असलेली टोल वसुली बंद करण्यात टोल वसुली आठ दिवसाच्या आत टोल वसुली बंद करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देत काम पूर्ण झाल्यावर वसुली करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
- गौप्यस्फोट ; ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात, मोठ्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
- …आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध, लवकरच बिगूल वाजणार ?
- राज्यात पुन्हा दोन उपमुख्यमंत्री? परंतु मुख्यमंत्री कोण? उपमुख्यमंत्री कोण? केव्हा होणार शपथ विधी? महत्वाची माहिती आली समोर
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक ५३ वरील तरसोद फाटा ते चिखली हद्द ही ६५ किलोमीटर असून या महामार्गावर टोल वसुली ही नशिराबाद हद्दीतील ओरिएंट सिमेंट कारखान्याजवळ सुरू आहे. परंतु पूर्वीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ असताना येथील डेरेदार वृक्षाची कत्तल करण्यात आलेली होती. त्या बदल्यात आत्तापर्यंत वृक्षारोपण न करता आणि राज्य महामार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत असताना टोल वसूल करण्यात येत आहे.
महामार्गांचे बाकी असलेले काम पुर्ण केल्यानंतरच टोल वसुली करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने जनतेला सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येईल, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष मुकूंदा रोटे यांनी निवेदनात देण्यात आला आहे.