भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

PSI बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एमपीएसी या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी बहिणीकडे राहत असलेल्या तरुणाने एमपीएसी परीक्षेत कमी मार्क मिळाल्‍याने नैराश्‍येतुन टोकाचे पाऊल उचलत बहिणीच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

अमळनेर तालुक्यातील आनोरे गावातील रहिवासी महेंद्र देवीदास पाटील वय २२ हा जानेवारी महिन्यात जळगाव शहरातील आहुजानगरात वास्‍तव्‍यास असलेली बहिण भारती हरेंद्र पाटील यांच्याकडे पीएसआय बनण्याचे त्याचे स्वप्न घेऊन

राहायला आला होता. तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता.काही दिवसांपूर्वी त्याने गृप डी अंतर्गत एमपीएससीची परीक्षा ही दिली होती. त्यात त्याला कमी मार्क पडले होते. शिवाय राज्‍यसेवेच्‍या जागांची जाहिरात नुकताच प्रसिद्ध झाली असता त्‍यात कमी जागा असल्‍याने महेंद्र हा नैराश्‍येत असल्‍याची माहिती त्‍याच्‍या मेव्हण्यांनी दिली .नुकत्याच झालेल्या परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने आत्महत्या करत असल्याचा,मृत्यूपूर्वी महेंद्र याने लिहलेल्या चिठ्ठीत उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली .

दरम्यान,महेंद्र याची बहिण व मेव्हणे २२ मे रोजी आनोरे गावात लग्नाला गेले होते. यावेळी महेंद्र हा घरी एकटाच होता. महेंद्र यास त्याची बहिण भारती यांनी मंगळवारी फोन केला. मात्र बिझी असल्याने संपर्क होवू शकला नाही. त्यामुळे भारती ह्या बुधवारी सुध्दा सकाळपासून महेंद्र यास कॉल करत होते. मात्र फोन न लागल्‍याने भारती यांनी त्यांचे शेजारी यांना खात्री करण्यास सांगितले. शेजारी घरी गेले असता दरवाजा आतून लावलेला होता. दरवाजा ठोठावून प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर शेजारच्यांनी पोलिसांशी संपर्क साधला,तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरिक्षक नयन पाटील सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत शेवटच्या बेडरूम मधील खिडकीचे लॉक तोडले असता महेंद्र गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दरवाज्याचे लॉक तोडून मृतदेह बाहेर काढत जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!