क्राईमजळगाव

“आज मैं आत्महत्या करनेवाला हूं, प्लीज मुझे फॉलो करे,कमेंट करे” व्हिडिओ व्हायरल करत तरुणांची आत्महत्या

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। ” हॅलो गाइज, आज मैं आत्महत्या करनेवाला हूं, प्लीज मुझे फॉलो करे, कमेंट करे, ओके बाय, जय बाबा टकाटक ” हा नऊ सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल करत २२ वर्षीय तरुणाने जळगाव येथे आज सकाळी गुरुवार रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आज गुरुवार रोजी धीरज शिवाजी काळे, वय २२ वर्षे , रा. हरिविठ्ठलनगर,जाळगाव, हा तरुण स्टेट बँक कॉलनीतील एका बंगल्यात वडिलांसोबत फर्निचर चे काम करीत असता काही वेळ काम करून सकाळी १०.१५ ते १०.३० च्या सुमारास त्याचे वडील दुसऱ्या खोलीत काम करीत होते त्यांनी त्याला जेवणासाठी आवाज दिला असता त्याचे काहीच उत्तर न आल्याने त्यांनी दुसऱ्या खोलीत जाऊन बघितले असता त्याने आत्महत्या केल्याचे लक्षात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!