मोठी बातमी ; जिल्हा दूध संघाची निवडणूक ठरल्या तारखेलाच
जळगाव,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या पश्वभूमीवर अनेक मोठं मोठया घडामोडी घडत असताना जळगाव जिल्हा दूध संघाची दोन दिवसापूर्वी स्थगित झालेली निवडणूक प्रक्रिया वेळेवरच होणार असल्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे.
राज्यात ग्रामपंचायत निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारने जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकांची प्रक्रियेला शासनाने स्थगिती दिली होती, परंतु निवडणूक वेळेवर व्हावी या साठी चाळीसगांव चे आमदार व दुध संघाचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत निवडणूक वेळेवर घेण्याची विनंती केली होती. याबाबतचे आदेश नुकतेच नुकतेच काढण्यातआले आहेत. या आदेशात २९ नोव्हेंबर रोजी ज्या टप्प्यावर निवडणूक थांबवण्यात आली होती, तेथूनच पुढे सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राचे कार्यकारी अधिकारी अनिल जे. चौधरी यांच्या सहीचे हा आदेश असून शासनच्या नव्या आदेशानुसार १० डिसेंबर रोजीच मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या तारखेत कोणताही बदल नसल्याचे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी सांगितले.