क्राईमजळगाव

दोन हजाराची लाच घेतांना जळगाव तहसील कार्यालयातील शिपाई एसीबीच्या जाळ्यात

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। जळगाव तहसील कार्यालयातील शिपाई मगन गोबा भोई याला संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दोन हजारांची लाच घेतला रंगेहात हात अटक करण्यात आली.कारवाईमुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की,तक्रारदार या घटस्फोटीत असून निराधार असून मुलगी व आई सोबत त्या वास्तव्यास आहेत. जळगाव तहसील कार्यालयाचे रेल्वे स्थानकाजवळील पोलिस कार्यालयाजवळ कार्यालय असून तेथे शिपाई मगन भोई हे संगायो योजनेचे फार्म जमा करतात. संगायो योजना निराधार योजनेंतर्गत लाभार्थींचे फार्म स्वीकारणे व लाभार्थींना शासकीय अनुदान मिळवून देणे हे त्यांचे काम आहे.

तक्रारदार त्यांच्याकडे आल्यानंतर आरोपीने बुधवारी त्यांच्याकडे आईचे काम करून देण्यासाठी तीन हजार व तक्रारदाराचे काम करून देण्यासाठी दोन हजार मागितले होते मात्र आधी तक्रारदारांचे काम करून देण्यासाठी दोन हजार मागितल्याने तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवून सापळा रचण्यात आला. बुधवारी दुपारी एक वाजता लाच स्वीकारताच मगन गोबा भोई रा. वाघ नगर, जळगाव या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!