भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावशैक्षणिक

TET Exam Scam ; जळगाव जिल्ह्यात किती बोगस शिक्षक? राज्यातील बोगस शिक्षक संख्या जाहिर

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जाळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। राज्यातल्या शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्या (TET) प्रकरणी आता पर्यंत अनेकांना अटक केली असून बोगस शिक्षकांची यादी आता उघड झाली आहे. महराष्ट्रातील बोगस शिक्षकांची यादी उघड झाल्याची माहिती झी 24 तास न्यूज चॅनेलने गौप्यस्फोट केल्याने मोठी खडबड उडाली आहे .यात जळगाव जिल्ह्यात ६१४ शिक्षक गैरमार्गाने भरती झाल्याचे दिसते.

२०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत ७,८८० बोगस शिक्षकांची भरती करण्यात आलेली असून, परीक्षेत नापास झालेल्या उमेदवारांची नावं पैसे घेऊन पात्रता यादीत घुसवण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं होतं पात्रता परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे उघळ झाले. जळगाव जिल्ह्यात तब्बल ६१४ शिक्षक गैरमार्गाने परिक्षेत उत्तीर्ण होऊन नोकरीला लागले असल्याचे उघड झाले आहे.या मुळे बोगस शिक्षकांना धडकी भरली आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती बोगस शिक्षक?

मुंबई दक्षिण – 40
मुंबई पश्चिम – 63
मुंबई उत्तर – 60
रायगड – 42
ठाणे – 557
पालघर – 176
पुणे -395
अहमदनगर – 149
सोलापूर – 171
नाशिक – 1154
धुळे – 1002
जळगाव – 614
नंदुरबार – 808
कोल्हापूर – 126
सातारा – 58
सांगली – 123
रत्नागिरी – 37
सिंधुदुर्ग – 22
औरंगाबाद – 458
जालना – 114
बीड – 338
परभणी – 163
हिंगोली – 43
अमरावती – 173
बुलढाणा – 340
अकोला – 143
वाशिम – 80
यवतमाळ – 70
नागपूर – 52
भंडारा – 15
गोंदिया – 09
वर्धा – 16
चंद्रपूर – 10
गडचिरोली – 10
लातूर – 157
उस्मानाबाद – 46
नांदेड – 259

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!