भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावशैक्षणिक

TET Exam Scam ; जिल्ह्यातील आणखी ६७ बोगस शिक्षकांचे पगार बंद, दलाल रडारवर, वाचा संपूर्ण यादी

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी (TET Exam Scam) परीक्षेत २०१९मध्ये गैरप्रकार झाला होता. जिल्ह्यात ६१४ जणांकडे टीईटी परीक्षेचे बोगस प्रमाणपत्र आहे. त्यामुळे संबंधितांवर आजीवन परीक्षा बंदीची कारवाई झाली आहे. तसेच बोगस प्रमाणपत्राच्या आधारे शिक्षक म्हणून नोकरी मिळवलेल्यांवर कारवाई सुरू झाली आहे. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील ७१ शिक्षकांचे ऑगस्टचे वेतन थांबवण्यासह भविष्यात शाळांनी संबंधित शिक्षकांचे नाव वेतन देयकात समाविष्ट करू नये, असे आदेश शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षकांनी दिले होते. त्यानंतर प्राथमिक शिक्षक विभागाने देखील जळगाव जिल्ह्यातील ६७ प्राथमिक शिक्षकांचे असेच आदेश काढले आहेत.

माध्‍यमिकचे शिक्षक जास्‍त ; दलाल रडारवर
अपात्र उमेदवारांची यादी मॅपिंगसाठी पाठविण्यात आली होती. अपात्र उमेदवारांपैकी ४४७ उमेदवार हे राज्यातील शाळांमध्ये शिक्षण सेवक, सहशिक्षक, मुख्याध्यापक पदावर कार्यरत असल्याचे समोर आले होते. यात जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक विभागाचे ६७ तर माध्यमिक विभागाच्या ७१ शिक्षकांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणातील आणखी काही दलाल पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दलालांनी अनेक शिक्षकांना गंडवले आहे. अनेकांना भीती घालून टीईटी देण्यास भाग पाडण्यात आले. एवढेच नव्हे तर, त्यांच्याकडून मोठ्या रक्कमा उकळण्यात आल्या आहेत.

वेतन रोखण्यात आलेल्या जळगाव जिल्ह्यातील ६७ प्राथमिक शिक्षकांची तालुकानिहाय संपूर्ण यादी !अमळनेर तालुका
स्नेहल राजेंद्र लांडगे (साने गुरुजी विद्यामंदीर, अमळनेर),सुवर्णा शालीग्राम पाटील (साने गुरुजी विद्यामंदीर, अमळनेर),रुपाली अभिषेक पांडे (नविन मराठी स्कूल,अमळनेर),शेख मोइद्दीन निमान (अंजुमन इ. उर्दू प्रा.शाळा, अमळनेर),अनिफ मुस्ताक केरेसी (अंजुमन इ. उर्दू प्रा.शाळा, अमळनेर),राकेश शालीग्राम पाटील (कै.युवराज पाटील प्राथ. विद्यामंदीर, अमळनेर),चेतन विलास कदम (हुतात्मा विरभाई कोतवाल संचलित प्राथमिक शाळा, अमळनेर),

भुसावळ तालुका
अंजली हरीभाऊ सोनवणे (बालविकास प्राथ.प्रा.स्कूल,करब),विकास राजाराम झोडगे (बालविकास प्राथ.प्रा.स्कूल,करब),अमोल रामकृष्ण पाटील (श्री.आर.एन.मेहता हिंदी प्राथ. भुसावळ),इराम सभाशेख मोहमंद शकील (राजा हुसेन उर्दू प्राथ.स्कूल, भुसावळ),कोनिता कश्मिर कोलघर (सेंट अंलायसेस प्राथ.स्कूल,भूसावळ),अर्चना जगदीश पाटील (स्व.सुशिलाबाई नामदेव फालक प्राथ.स्कूल,भुसावळ),समिर मुखतार तडवी (स्व.सुशिलाबाई नामदेव फालक प्राथ.स्कूल,भुसावळ),राजेंद्र मोहन पाटील (इंदिरागांधी प्राथ.विद्यामंदिर, साकेगाव),वर्षा पृथ्वीराज पाटील, (विवेकानंद विद्यामंदिर, भुसावळ),सचिन युवराज महाजन (विवेकानंद विद्यामंदिर, भुसावळ)

चाळीसगाव तालुका
विनोद साहेबराव चौधरी (कै.सुवर्णाताई प्राथ.स्कूल,चाळीसगाव),प्रियंका संजय सोनवणे (राष्ट्रीय प्राथ.विद्यालय, चाळीसगाव)

चोपडा तालुका
प्रियंका सुयोग हिवाळे (एव्ही मिशन स्कूल,धानोरा),पराग शालीग्राम चौधरी (एव्ही मिशन स्कूल,धानोरा),हर्षल अशोक सोनवणे (कस्तूरबा प्राथमिक चोपडा),हर्षल अशोक साळुंखे (बालमोहन प्राथमिक, चोपडा),सोनाली सुधाकर साळुंखे (बालमोहन प्राथमिक, चोपडा),वैशाली सुरेश वसईकर (बालमोहन प्राथमिक, चोपडा),राहुल सुभाष पाटील (बालमोहन प्राथमिक, चोपडा)

धरणगाव तालुका
पंकज मंगल पाटील (आदर्श प्राथमिक शाळा, धरणगाव), केतनकुमार जगन्नाथ सोनवणे (कै.जि.एन.चांदसरकर बालमोहन शाळा, जळगाव)

जळगाव शहर आणि तालुका
स्मिता उदयसिंक सिसोदे (कै.जि.एन.चांदसरकर बालमोहन शाळा, जळगाव),देशमुख शरीनाबेगम अब्दुल केदार (मिल्लत प्राथमिक स्कूल, मेहरुण),राहुल सुरेश धनगर (बालनिकेतन विद्यामंदिर, जळगाव),तनवीर शाह तफ्फजुल शाह (डॉ. शाहीन काजी उर्दू स्कूल, जळगाव),कविता किशोर वंजारी (सौ.के.जी.मनियार प्राथ.विद्यालय,जळगाव),रितेश अरुन वंजारी (सौ.के.जी.मनियार प्राथ.विद्यालय,जळगाव), कल्पीता गोविंद खोरे (छत्रपती शिवाजी विद्यालय, जळगाव),रुकसाना रमजान तडवी (छत्रपती शिवाजी विद्यालय, जळगाव),प्रशांत ईश्‍वर चौधरी (छत्रपती शिवाजी विद्यालय, जळगाव),पुजा सुरेश बागुल (छत्रपती शिवाजी विद्यालय, जळगाव),सद्दाम इतबार तडवी (श्री.स्वामी समर्थ विद्यामंदिर, कुसुंबा),अमोल मधुकर कोल्हे (श्री संतमुक्ताबाई प्राथ.विद्यामंदिर, जळगाव),दिनेश पंढरीनाथ चव्हाण (प्राथ.शाळा, म्हसावद),शैलेश विलास वाघ (प्राथ.शाळा, म्हसावद),सुनिल तापीराम बारेला (प्राथ.शाळा, म्हसावद),प्रशांत रविंद्र पाटील (प्राथ.शाळा, म्हसावद),वैशाली शांताराम पाटील (प्राथ.शाळा, म्हसावद),तान्या रविंद्र भातकर (प्राथ.शाळा, म्हसावद),राजेंद्र भाऊराव जोगी (प्राथ.शाळा, म्हसावद),

एरंडोल तालुका
सुयोग मुरलीधर पाटील (भारती विद्यामंदीर, कासोदा),हिरालाल केशव मोरे (भारती विद्यामंदीर, कासोदा),महेंद्र शांताराम पाटील (भारती विद्यामंदीर, कासोदा),ऋषिकेश निंबा निकम (भारती विद्यामंदीर, कासोदा),कुलदिप एकनाथ देसले (भारती विद्यामंदीर, कासोदा),हर्षल राजेंद्र सुर्यवंशी (भारती विद्यामंदीर, कासोदा)

जामनेर तालुका
संजय भागवत बोरसे (सरस्वती प्राथमिक स्कूल, शेंदुर्णी),हर्षल पांडूरंग महाजन (सरस्वती प्राथमिक स्कूल, शेंदुर्णी),प्रनल रविंद्र बाविस्कर (सरस्वती प्राथमिक स्कूल, शेंदुर्णी),धनश्री हर्षल महाजन (सरस्वती प्राथमिक स्कूल, शेंदुर्णी),प्रमोद हिम्मतराव पाटील (सरस्वती प्राथमिक स्कूल, शेंदुर्णी),अतुल कौतिक पाटील (ए.जी. गरुड प्राथमिक, शेंदुर्णी)

पाचोरा तालुका
सुरेश अविनाश पाटील (प्रायमरी स्कूल, पाचोरा)

पारोळा
गौरव प्रविण बडगुजर (बालाजी व्ही.पी.एम. विद्यामंदीर,पारोळा),मिनाक्षी साहेबराव चव्हाण (बालाजी व्ही.पी.एम. विद्यामंदीर,पारोळा),शितल पंडीत शिरसाठ (बालाजी व्ही.पी.एम. विद्यामंदीर,पारोळा), नितीन भरत जाधव (बालाजी व्ही.पी.एम. विद्यामंदीर,पारोळा)

रावेर तालुका
वैशाली ईश्‍वर पद्मे (प्राथमिक विद्यामंदिर, सावदा),झुलकर खान इबदत खान (अलहत उर्दू प्राथमिक स्कूल, रावेर)

यावल
शकील इस्माल तडवी (यावल प्राथमिक यावल)

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!