भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

मोठी बातमी : बजेट बिघडले, सोन्याचा दर ६२ हजारांवर

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर गेला, देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे दिवसेंदिवस महाग होत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. ऐन लगीन सराईच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात दिवसागणिक मोठी वाढ होत आहे. सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. जळगावात सोन्याच्या किंमतींने ६२ हजारांवर उसळी घेतली आहे.

सोन्याचे दर आज एस टी सह ६२००० च्या वर जाऊन पोहचल्याने आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहे. जागतिक पातळीवर अनेक बँका तोट्यात गेल्यानंतर गुंतवणूकदारांनी बँकामधील पैसे काढून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आणि परिणामी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

सर्वसामान्य ग्राहकांना सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने दर आवाक्याबाहेर गेले आहे. सध्या सणासुदीचा आणि लग्नसराईचा काळ सुरू आहे. आता सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने ग्राहकांना आता अधिकीचे पैसे मोजावे लागणार हे मात्र नक्की.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!