क्राईमजळगाव

महिला डॉक्टर ला रात्रभर दारू प्यायला……त्या नंतर …डॉक्टर ला एक वर्ष सक्तमजुरी

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। दिवस 2 जून 2021 रोजी जळगाव जिल्ह्यातील पहूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. जितेंद्र वानखेडे हा कार्यरत असताना त्याने सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याची घटना घडली यात आरोपी डॉक्टरला एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील पहूर ग्रामीण रुग्णालयात जितेंद्र वानखेडे हा वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याने 2 जून 2021 रोजी आपल्याच सहकारी महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित महिला डॉक्टरची तक्रार अशी की, 2 जून 2021 रोजी पीडित महिला ही ड्युटीवर असताना रात्री सुमारे साडेबारा वाजता डॉ. वानखेडे हा तिथे आला. यावेळी त्याने त्याच्या बायकोचा वाढदिवस असल्याने काही पदार्थ खाण्यासाठी आग्रह धरला. परंतु डॉक्टर आरोपी दारुच्या दशेत असल्याने पीडितेने पार्सल घेतले आणि दार बंद करून घेतले.पुन्हा या महिला डॉक्टरला रात्री 1 वाजेच्या सुमारास आरोपी डॉक्टरचा फोन आला की तिला व्हाट्सएपवर यायला सांगितले.तेव्हा आरोपी डॉक्टर हा रात्रभर तिला दारू प्यायला पुन्हा -पुन्हा सांगत होता.

या संपूर्ण प्रकारला महिला डॉक्टर खूप कंटाळली.व तिने त्रासून अखेर पहूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली त्या नुसार आरोपी पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.याच प्रकरणात न्यायाधीश डी. एन चामले यांच्या न्यायालयाने गुरुवारी वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडे याला वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.  

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!