भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

सरकारने घाईघाईत निर्णय घेऊन आजचे मरण उद्यावर ढकलले – माजी मंत्री एकनाथ खडसे

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्य सरकारने सगेसोयरेबाबत अध्यादेश काढत कुणबी नोंदी असलेल्यांच्या नातेवाईकांना आरक्षणाचा दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे या निर्णयावर टीका होत आहे. मराठा आंदोलकांच्या प्रचंड दबावामुळे सरकार झुकले आणि आजचं मरण उद्यावर ढकलत हा सगेसोयऱ्याचा निर्णय घाईघाईत घेतला असे राष्ट्रवादीचे नेते,माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या मागणीनूसार अध्यादेश काढत सध्या तरी आंदोलन संपविण्यात सरकारला यश आले असले तरी भविष्यात फसवणूक झाली तर मराठा समाज सरकारला माफ करणार नाही असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. सगेसोयरे म्हणजे रक्तातील नाती असा अर्थ अपेक्षित असतो. आई, वडील, भाऊ, बहीण, बाप असे असते. घरात सून आली, सगेसोयरे म्हणजे व्याही मंडळी इतर नातलग या निकषात बसत नाहीत. बसत असले तर आनंदच आहे. पण सरकार एकाप्रकारे मराठा समाजाची दिशाभूल करतंय की काय, असे होता कामा नये. हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टीकला पाहीजे. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह पिटीशन दाखल असल्याने त्याचा निर्णय दोन तीन आठवड्यात अपेक्षित आहे. त्यानंतर हा निर्णय घेतला असता तर अधिक संयुक्तिक झाले असते.असेही खडसे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!