भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

BHR प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झवरला अटक

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

जळगाव (प्रतिनिधी) भाईदास हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या घोटाळ्या प्रकरणी अखेर मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या सुनील झंवर याला अटक केल्याने या घोटाळ्याचे धागेदोरे कुणापर्यंत जाऊन पोहचले आहे याचा उलगडा होणार आहे.

बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. पोलिसांनी त्याला फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर त्याने पुण्याच्या विशेष न्यायालयात शरण येत वॉरंट रद्द केले असून त्याला १७ मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला मिळवून घेतला होता. भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर पाच मार्चला पुण्याच्या विशेष न्यायालयात शरण आला. त्याने फरार घोषित होण्याचे वॉरंट रद्द करून घेतले होते.

सुनील झंवरला दोन मार्चला मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून बचावासाठी १५ दिवसांचा दिलासा दिला होता. झंवर याने १५ दिवसांच्या आत पुण्याच्या सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करून सुनावणीसाठी मुदत देण्यात आली. तर दुसरीकडे पुण्याच्या न्यायालयाने झंवर व कंडारे यांना फरार घोषित करण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी घोषणापत्र जारी केले होते. या घोषणापत्रानुसार ३० दिवसांच्या आत म्हणजेच १४ मार्चपर्यंत दोघांना न्यायालय, पोलिसांना शरण येण्याचे वॉरंट काढले होते. या वॉरंटची मुदत येणाऱ्या आठवड्यात संपुष्टात आल्यानंतर दोघांना फरार घोषित करण्यात येणार होते, असे झाल्यास त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठीची कार्यवाही सुरू झाली असती. तत्पूर्वी झंवर याने पाच मार्च रोजी पुण्याच्या न्यायालयात स्वत: हजर राहून वॉरंट रद्द करून घेतले होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!