TET सोबत म्हाडा पेपर फुटीचे धागेदोरे जळगावात, मुख्य संशयिताला जळगावातून अटक
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने म्हाडा पेपर फुटीतील मुख्य संशयित बालाजी प्लेसमेंट चे संचालक विजय दर्जी याना जळगावातून ताब्यात घेतल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहाराच्या संदर्भात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी जळगावात छापेमारी केली,जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये असलेल्या बालाजी जॉब प्लेसमेंट येथे टीईटी घोटाळ्याचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने आज सकाळी धाडसत्र राबविले. या धाडसत्रात पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली? किती जणांना ताब्यात घेतले किंवा काय कागदपत्र जमा केली? याचा तपशील मिळू शकला नसला. तरी या कारवाईच्या वृत्ताला पुणे पोलिसांनी दुजोरा दिला आहे. तसेच टीईटी घोटाळ्याचा तपास करत असताना जळगाव येथील बालाजी जॉब प्लेसमेंटचे विजय दर्जील पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने म्हाडा पेपर फुटीप्रकरणी ताब्यात घेतले असल्याच्या वृत्तालाही पुणे पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
यात सुशिक्षित तरुणांना नोकरी लावून देण्याचे काम ते करतात. दरम्यान, टीईटी घोटाळ्यातून म्हाडा पेपर फुटीचे प्रकरण जळगाव जिल्हापर्यंत पोहोचल्यामुळे जिल्ह्यात अधिकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडर TET प्रकरणी जळगाव, यावल ,भडगाव व पारोळा तालुक्यातील काही एजंटाकरवी जिल्ह्यात टीईटी घोटाळ्यातील गैरव्यवहाराला मोठी चालना देण्यात आली होती. चौकशीनंतर तपासाची दिशा त्यांच्यादिशेने असेल, हे स्पष्ट झाले होते. दरम्यान, जी.ए. सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याच्याबरोबर सुरंजित गुलाब पाटील (५०) रा.उत्तरानगर, नाशिक, स्वप्निल तीरसिंग पाटील रा.शिक्षक कॉलनी, चाळीसगाव, जळगाव अशी अटक केलेल्यांची नावे होती.
गेल्या दीड वर्षा पासून राज्यात शिक्षकांच्या TET घोटाळ्याची तपासणी सुरू आहे.धक्कादायक म्हणजे म्हाडा पेपरफुटीप्रकरणी पुणे पोलिसांनी काही कॉल रेकॉर्डिंग तसेच सोशल मीडियाचे स्क्रीन शॉटसह आणखी काही महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केला केले असल्याचे कळते.