भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

विद्यार्थिनीलाच घेऊन शिक्षक फरार, संतप्त पालकांनी ठोकले शाळेला कुलूप

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिक्षकानेच विद्यार्थिनीला पळवून नेल्याची तक्रार पालकांनी केली असून
ग्रामस्थांनी पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकून शिक्षकाला अटक करण्याची मागणी केली आहे.सदरची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील ढासला येथील असून हा शिक्षक मात्र जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवाशी आहे ,या बाबत करमाड पोलिस ठाण्यात दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राहणारी एक विद्यार्थिनी ढासला येथील एका शाळेत शिक्षण घेत होती. बारावीला ती पासही झाली. त्यानंतर ती भावासह लाडसावंगीत एमएससीआयटीच्या वर्गासाठी मोटारसायकल वरून येत असत सदरील विद्यार्थिनी, तिचा भाऊ लाडसावंगी येथे आल्यानंतर भाऊ ट्युशन साठी दुसरीकडे गेला. ही विद्यार्थिनी क्लाससाठी दुसऱ्या ठिकाणी गेली. ट्युशन सुटल्यानंतर भाऊ तिला घेण्यासाठी आला असता तिच्या मैत्रिणीने व शिक्षकांनी ती आज क्लासला आलीच नसल्याचे सांगितले. त्यामुळे तिचा भाऊ परत घरी निघून गेला. त्यामुळे सदरील विद्यार्थिनीच्या आईने करमाड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान शाळेतील इंग्रजी विषयाच्या एका शिक्षकाचा अधूनमधून फोन येत होता. या शिक्षकानेच आपल्या मुलीस कुठेतरी नेले असावे असा संशय तक्रारीत व्यक्त केला आहे.

ही बाब समजताच संतप्त झालेल्या पालकांनी बुधवारी सकाळीच सोनामाता हायस्कूल गाठून प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. तसेच गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाला निलंबित करावे, यासह विविध मागण्या करत शाळेला टाळे ठोकले. आरोपी शिक्षकाला अटक होत नाही तसेच मुलीला जोपर्यंत पालकांच्या ताब्यात परत देत नाही तोपर्यंत शाळा उघडू देणार नसल्याची भूमिका घेतली. या घटनेमुळे शाळेच्या परिसरात तणावाचे वातावर निर्माण झाले होते.
महेंद्र साठे असं विद्यार्थिनीला पळवून नेणाऱ्या शिक्षकाचं नाव असून तो जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आलं.असंही सांगण्यात आलं की महेंद्र त्र्यंबक साठे , वय ४१, हा पळसखेडा ता. जामनेर, जळगाव, येथील मूळ रहिवाशी आहे.

शिक्षकाने फूस लावून पळवून नेलेली विद्यार्थिनी नुकतीच सोनामाता माध्यमिक आणि उच माध्यमिक हायस्कूलमधून बारावी परीक्षा पास झाली होती. याच शाळेत महेंद्र साठे हा इंग्रजी विषय शिकवत होता. दरम्यान, बारावी पास झाल्यानंतर महेंद्र याने पीडित विद्यार्थिनीला संगणकाचे क्लास लावण्याचा सल्ला दिला. बदनापूर येथे क्लास लावून देतो, असे सांगत त्याने मंगळवारी ४ वाजेच्या सुमारास विद्यार्थिनीला तेथे बोलावून घेतले. विद्यार्थिनी तेथे गेली असता, महेंद्र याने तिला फूस लावून पळवून नेले. हा प्रकार विद्यार्थिनीच्या पालकाच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सोनामाता विद्यालयात धाव घेतली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!