जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा पारा 43.5 अंश
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची तीव्र स्वरूपाची लाट असल्याचं पाहायला मिळत असून आज 43.5 इतक्या उच्च तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान पुढील काही दिवसात महाराष्ट्रातील तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढणार आहे. वाढत्या उन्हामुळे गेल्या दोन दिवसापूर्वी एकाचा उष्मा घाताने मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. सध्या असलेले उन्हाची लाट अजून काही दिवस अशीच कायम राहिली तर अजूनही उष्मा घाताचे बळी वाढू शकणार असल्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मे महिन्यात काय होणार असा विचार करून लोकांची चिंता वाढली आहे.
दरम्यान पुढील काही दिवसात महाराष्ट्रातील तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढणार आहे. पुढील 2 ते 3 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही ठिकाणी तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ होणार आहे. अहमदनगर, जळगावमध्ये उष्णतेच्या लाटेच्या अंदाजासोबतच उष्मघाताची शक्यता आहे.