भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण जळगाव पोलिसांच्या ताब्यात

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांना निलेश भोईटे यांच्या घरावर अवैध छापा टाकल्याच्या प्रकरणात जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जळगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या बाबत अधिक माहिती आधी की, दि.७ ऑक्टोंबर २०२२ रोजी शहर पोलिसात निलेश भोईटे यांनी तक्रार दिली होती. भोईटे यांनी दिलेला फिर्यादीनुसार, त्यांच्याविरुद्ध निंभोरा पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा पुणे येथे वर्ग केला होता. या गुन्ह्यात कोथरूड पोलिसांनी जळगावच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने भोईटे यांच्या जळगावातील भोईटे नगरातील घरी ९ जानेवारी २०२२ रोजी छापा टाकला होता. यावेळी भोईटे घरी नव्हते. या कारवाईत पोलिसांनी तपासणी केल्यानंतर विजय भास्कर पाटील व किरणकुमार साळुंखे हे त्यांच्या स्विफ्ट डिझायर कारने (क्र. एमएच.२०.बीएन.०९०) रात्री १०.१५ ते १०.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या इतर साथीदारांसोबत आले. त्यांनी बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर सोबत आणलेल्या काळ्या रंगाच्या कापडी पिशवीत काही फाइल्स व रक्ताने माखलेला चाकू घरात ठेवला होता. यामागे मला गंभीर गुन्ह्यात अडकवण्याचा कट आहे. या सर्व बाबींचे सीसीटीव्ही फुटेज व रेकॉर्डिंग असल्याचे भोईटे यांनी तक्रारीत म्हटले होते.

तक्रारदाराच्या पुरवणी जबाब आणि गुन्ह्याचा तपासीअंती यामध्ये संशयित तत्कालीन सरकारी वकील ऍंड. प्रवीण चव्हाण, महेश आनंदा पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, जयेश भोईटे आणि सुनिल दत्तात्र्य माळी या संशयिताची नावे वाढविण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड हे करीत आहेत. तर चाळीसगाव येथे दाखल खंडणीच्या असलेल्या गुन्ह्या संदर्भात ऍड. प्रवीण चव्हाण हे चाळीसगाव येथे आज (रविवार) आले होते. यावेळी जळगाव शहर पोलिसात दाखल गुन्ह्यात त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच चाळीसगाव येथून ऍड. चव्हाण यांना जळगाव शहर पोलीस ठाणे येथे आणण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!