Jalgaon crime : तरुणीला शरीर सुखाची मागणी, महावितरण कार्यालयातील प्रकार
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एक तरुणी महावितरण कंपनीत कंत्राटी मध्ये काम करीत असताना कामावरून काढण्याची धमकी देत तरुणीकडे एकाने शरीरसुखाची मागणी केली तर दुसऱ्याने घरी सोडून देतो म्हणत चुंबनाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार घडला.
- यावल तालुक्यात अमोल जावळे याना उस्फुर्त प्रतिसाद, सर्वसामान्यांकडून महायुती सरकारच्या निर्णयांचे कौतुक
- US Election 2024 Live Updates : अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय
- ब्रेकिंग : विनोद सोनवणे गोळीबार प्रकरणात तीन संशयित ताब्यात; दोन फरार !
या बाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी ही जळगाव येथील महावितरण कार्यालयात कंत्राटी पद्धतीत कामाला होती,सदर तरुणीला महावितरण कार्यालयातील एच.आर. व्यवस्थापक उद्धव कडवे याने शरीरसुखाची मागणी करत गैरवर्तन केले,हा प्रकार या महिला कर्मचाऱ्यासोबत सन २०१७ ते आज पर्यंत सुरूच होता. असे असतांना १ जून रोजी सायंकाळी ७ ते ७:३० वाजेच्या दरम्यान देखील महावितरण कार्यालयातील एच.आर. व्यवस्थापक उद्धव कडवे याने शरीरसुखाची मागणी करत गैरवर्तन केले,तरुणीने मागणी फेटाळल्याने तरुणीला कामावरून कमी केले. त्याच प्रमाणे कार्यालयातील राजेंद्र आमोदकर रा. जळगाव याने देखील गैरवर्तन करून “मी तुला घरी सोडतो असे सांगून महिलेच्या गळ्यात हात टाकून मला किस दे” असे म्हणत तिचा विनयभंग केला.
या बाबत महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करणाऱ्या व्यवस्थापका विरोधात जळगाव परिमंडळ महावितरण संयुक्त कृती समितीतर्फे द्वार सभेद्वारे घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येऊन व्यवस्थापकाला अटक करण्याची मागणी केली . तरुणीने बुधवारी १ जून रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने त्यांच्या तक्रारीवरून एच.आर. व्यवस्थापक उध्दव कडवे आणि राजेंद्र आमोदकर दोन्ही रा. जळगाव या दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.