जळगाव जिल्ह्यातील चार तहसीलदारांच्या बदल्या
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महसूल संवर्गातील २० तहसीलदारांच्या बदलीचे आदेश राज्य शासनाचे सहसचिव डॉ.माधव वीर यांनी काढले असून जिल्ह्यातील चाळीसगाव पारोळा, अमळनेर व जळगावातील कूळ तहसीलदारांची बदली झाली आहे. बदल्या करण्यात आलेल्यानं मध्ये चाळीसगावचे तहसीलदार अमोल रमाकांत मोरे,अमळनेर तहसीलदार मिलिंदकुमार रामदास वाघ,पारोळा तहसीलदार अनिल बन्सी गवांदे,जळगावचे कुळकायदा तहसीलदार महेंद्र माळी यांच्या बदल्या झाल्या आहेत.
चाळीसगावचे तहसीलदार अमोल रमाकांत मोरे यांची राहता तहसीलदारपदी बदली झाली असून त्यांच्या जागी श्रीरामपूर तहसीलदार प्रशांत रघुनाथ पाटील बदलून येत आहेत.अमळनेर तहसीलदार मिलिंदकुमार रामदास वाघ यांची अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात (निवडणूक) तहसीलदारपदी बदली झाली असून त्यांच्या जागी अद्याप कुणाची नियुक्ती झालेली नाही.नंदुरबारचे महसूल तहसीलदार डॉ.उल्हास भाईदास देवरे यांची पारोळा तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे तर पारोळा तहसीलदार अनिल बन्सी गवांदे यांची नंदुरबार जि.का. तहसीलदार महसूल तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे.जळगावचे कुळकायदा तहसीलदार महेंद्र माळी यांची शिरपूर तहसीलदारपदी बदली झाल्याने त्यांच्या जागी नियुक्तीच्या प्रतीक्षेतील रावेर येथील उषाराणी देवगुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिरपूरचे तहसीलदार आबा गोविंदा महाजन यांची येवला तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे.