जळगाव जिह्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या,बाहेरील १५ अधिकाऱ्यांची जिल्ह्यात नियुक्ती
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। येत्या लोकसभा निवडणुकीच्या पश्वभूमीवर जळगाव जिह्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत प्रशासकीय पदस्थापना व बदल्या करण्यात आल्या असून जळगाव जिल्ह्यात १५ अधिकारी बाहेरील जिल्ह्यातून येत आहेत.
अहमदनगर येथून पोनि. मधुकर साळवे यांची प्रभारी चोपडा शहर पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण येथील पोनि.विकास देवरे अमळनेर पोलीस स्टेशन, पोनि.सुनील पाटील भडगाव पोलीस स्टेशन, पोनि.संदीप रणदिवे रामानंदनगर पोलीसस्टेशन, भुसावळ बाजार पेठचे पोनि.बबन आव्हाड यांची प्रभारी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन, भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे सपोनि. संतोष चव्हाण प्रभारी अडावद येथे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि.निलेश राजपूत यांची प्रभारी कासोदा पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण येथून सपोनि.प्रकाश काळे हे प्रभारी पिंपळगाव हरे. पोलीस स्थानकाला, पिंपळगाव हरे. येथील सपोनि.महेद्र वाघमारे, एमआयडीसी पोलीस स्टेशन, धुळे येथून सपोनि.गणेश फड यांची नियंत्रण कक्षात, अहमदनगर येथून सपोनि.तेजश्री पाचपुते नियंत्रण कक्षात, नाशिक ग्रामीण येथून सपोनि.कल्याणी वर्मा यांची जळगाव शहर पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण येथून पोलीस उपनिरीक्षक कैलास ठाकूर यांची निंभोरा पोलीस स्टेशन, अमळनेरचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांची देखील नियंत्रण कक्षात आले असल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी काढले आहेत.