दोन ग्रामसेवक निलंबित ; जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची कारवाई
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। येथे गुरुवारी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या आढावा सभेनंतर बोरगाव व वाघळूद येथील दोघा ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
गुरुवारी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या आढावा सभेत स्वच्छ भारत मिशन आणि घरकुल योजनेत कमी काम आढळून आल्या होत्या. तसेच सभेत उपस्थित मुद्दे व दप्तरात आढळून आलेल्या दिरंगाईमुळे धरणगाव तालुक्यातील आर. डी. पवार व बी. डी. बागूल या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. नांदेड, जांभोरे, रेल, सोनवद ,चावलखेडा, दोनगाव, वराड येथील येथील ग्रामपंचायतींच्या दप्तराची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. जळगाव तालुक्यातील उमाळे, पाथरी, शेळगाव, कुसुंबा, वावडडे, वडली, सुभाषवाडी, जवखेडे, वराड, बेडी येथील ग्रामपंचायत दप्तराचीही तपासणी करण्याचे आदेश डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.