गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी दोन तरूणांना अटक !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
जळगाव – पाचोरा शहराजवळील नदीलगत एक जीवंत काडतुस एक गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन तरूणांना जळगाव एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. दोघांवर पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे, जळगांव येथील एलसीबीच्या पथकाला पाचोरा शहरातील हिवरा नदीलगत असलेल्या सारोळा बु” रोडवरील महादेव मंदिर परीसरात दोन युवक गावठी कट्टा बाळगुन असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या आदेशानुसार पोलिस हेड कॉन्स्टेबल विलास पाटील, हरीष परदेशी व उमेश गोसावी यांनी सापळा रचून रात्री ८ वाजेच्या सुमारास महादेव मंदिर परीसरात अशोक बाबुलाल पवार (वय – २८) रा. सारोळा बु” ता. पाचोरा व सुरज नारायण शिंदे (वय – ३०) रा. कृष्णापुरी, पाचोरा यांचे जवळ एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस व काळ्या रंगाची बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल असा ५७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आरोपी अशोक पवार व सुरज शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय कायदा कलम ३ (२५) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खाली यशवंत घोडसे हे करीत आहेत.